नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात देशी दारूची वाहतूक करणारी मारुती स्विप्ट गाडी पकडली! पोलिसात गुन्हा दाखल


Advertisements
Ad 4

दि. १८ एप्रिल २०२५ रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला नियुक्तीस असलेले पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना गोपनीय बातमीदाराने पाचोरा शहरातील एका खाजगी वाहनातुन अवैधरित्या चोरटी देशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती दिली असता पो. नि. पवार यांनी ग्रेड पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पो. हे. काॅ. राहुल शिंपी, पो. काॅ. अशोक हटकर, होमगार्ड कपिल पाटील, पोलिस मित्र गणेश पाटील हे पथक शहरात गस्तीवर रवाना केले. दरम्यान दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास गिरड रोड वरील गो. से. हायस्कूलसमोर एक चारचाकी स्विफ्ट कार क्रं. एम. एच. १४ बी. के. ५१८५ जात असताना पथकाने सदरची कार थांबवुन झडती घेतली असता त्या कारमध्ये हिरव्या कपड्याखाली काही तरी झाकलेले आढळुन आले. सखोल तपासा अंती देशी दारु (टॅंगो पंच) चे ५ खोके त्यांची किंमत १५ हजार ५०० रुपये त्यातील प्रत्येक खोक्यात १८० मि. ली. च्या ४८ बाॅटल आढळुन आल्या. कार चालक गोविंद दत्तु पुजारी (वय – ३९) रा. शिवाजी नगर, पाचोरा याचेसह १ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली आहे. घटनेच पुढील तपास पो. नि. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. राहुल शिंपी हे करीत आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button