जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावाजवळ पुन्हा बिबट्याचे दर्शन! शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना काळजी घ्या.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून जंगलामध्ये वन्यजीव प्राण्यांना पाण्याअभावी गावाकडे पलायन करण्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या आणि बघितल्या असतील परंतु पाचोरा तालुक्यातील खेडगाव नदीचे परिसरातील वेरुळी शिवारात दोन बिबट्यांनी त्यांच्या बछड्यासह धुमाकूळ घातल्याची अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी अनुभव कळविला आहे. आज दिनांक २० एप्रिल २०२५ रात्री ८:२० च्या सुमारास खेडगाव नंदीचे गावाजवळ ग्रामसेवक राजू आप्पा यांच्या सालदाराने हायवेवर दोन बिबट्यांना प्रत्यक्ष दर्शी बघितले असल्याची माहिती दिली आहे याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे बाबत मधुर खान्देशच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले आहे