शिव स्वराज बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बांबरुड (राणीचे) येथील युवकांला “कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने केले सन्मानित

शिव स्वराज बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांना कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने सन्मानित केले. बांबरुड राणिचे (ता.पाचोरा) ता.२० पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांनी कला शाखेतील पदवी व डी. एड शिक्षण नोकरी च्या मागे न लागता शेती करण्यावर भर दिला. शेतीची आवड असल्याने किरण अशोक सुर्यवंशी यांची नेहमीच विविध प्रयोग करून त्यांनी विविध पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असून.किरण च्या वडीलांचे सांगने आहे की “नोकर न बनता,मालक बना” हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन किरण अशोक सुर्यवंशी हा शेती क्षेत्रात प्रयत्नशील आहेत. किरण अशोक सुर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेऊन शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था (पुनतगाव ता.नेवासा,जि, अहिल्याबाई नगर) तर्फे त्यांना दि. २० एफ्रिल रोजी महामानव विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय “कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने श्वेता परदेशी (मिसेस इंडिया विजेता)सिस्टर सिबी जाॅन (समाजसेविका) समाजभुषण गोल्डन मैन दिलीप भाऊ खरात व समाजभुषण संजय वाघमारे (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष) यांच्या हस्ते पुनतगान ता.नेवासा जि .अहिल्याबाई नगर येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्वेता परदेशी (मिसेस इंडिया विजेता)सिस्टर सिबी जाॅन (समाजसेविका) समाजभुषण गोल्डन मैन दिलीप भाऊ खरात सौ.हेमा जाधव पुणेकर,शिवशाहीर,बालशाहीर ओवी प्रसाद काळे,इशिका सुर्यवंशी पुणेकर ,समाजभुषण संजय वाघमारे (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष)बाळासाहेब शिरसाठ (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था उपाध्यक्ष)सौ, ताई साहेब संजय वाघमारे (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था सचिव )व इतर मान्यवर उपस्थित होते.