पाचोऱ्यातील डॉ.अपर्णा देशमुख गिरजाई सेवावर्ती पुरस्कारने सन्मानित! पुरस्कारात स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व २५ हजाराचा धनादेश !

मधुर खान्देश वृत्तसेवा: मूळ पाचोरा येथील मात्र डॉ. अपर्णा देशमुख पुणे नगरीत सिंहगड रोड येथे गेल्या पंधरा वर्षांपासून अविरत, निराधार, गोरगरिब वृद्धांना सेवा देणारे आभाळमाया वृद्धाश्रम चालवीत आहे. त्या पाचोरा येथील सेवानिवृत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अनिल देशमुख व सौ.निर्मला देशमुख यांच्या सुकन्या आहेत. डॉ. अपर्णा यांनी सुमारे पाच हजार वृद्धांचा सांभाळ केला असून, चार हजार गरजू वृद्ध रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या. हे ईश्वरी सेवेचे कार्य त्या स्वबळावर करीत आहेत. आजही त्यांचे वृद्धाश्रमात ८१ ज्येष्ठ महिला, पुरुष आहेत. डॉ. अपर्णा देशमुख यांच्या कार्याची, दखल घेत गिरजाई प्रतिष्ठान ठाणे यांचे वतीने राज्यस्तरीय मातोश्री स्व .गीरजाई ठुसे यांचे स्मरणार्थ शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह मानपत्र व २५ हजार रुपये चा धनादेश, सेवाव्रती पुरस्कार डॉ.अपर्णा देशमुख यांना प्रदान करून स्व. कॅप्टन विनायक गोरे यांचे वीरमाता अनुराधा गोरे जेष्ठलेखिका, व्याख्यात्या यांचे हस्ते तर प्रतिष्ठान चे अध्यक्ष विलास ठुसे, मानद सचिव विदुला ठुसे,संपदा वागळे, प्रदीप धवल या मान्यवरांचे उपस्थित आनंद दिघे विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय ठाणे येथे एसी सी हॉल मध्ये करण्यात आला आहे. डॉ. अपर्णा देशमुख अनेक पुरस्कारांनी सन्मानित डॉ.अपर्णा देशमुख यांना सन २०२२ ला राष्ट्रीय स्वयंम संघ जनकल्याण समिती महाराष्ट्रप्रांतचा प्रतिष्ठित मानाचा श्री.स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, कोल्हापूरचे सदगुरू सांगवडेकर रुकडीकर महाराज यांचा माऊली आनंदी पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार, दैनिक लोकसत्ता समूहाचा नवदुर्गा पुरस्कार, रोटरी इंटर ननॅशनलचा व्होकेशनल सेवा पुरस्कार , जर्नलिस्ट असोसिएशनचा सन्मान नवदुर्गा पुरस्कार, एनआर आय पॅरेंट्स असोसिएशन चा सन्मान पत्र, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख बहु उदेशिय संस्थेचा राज्यस्तरीय नारीशक्ती अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत.
डॉ. अपर्णा देशमुख यांनी मनोगतात पुरस्कार माझे वडील डॉ. अनिल देशमुख यांचे बरोबर व्यासपीठावर स्वीकारता आला या बद्दल अभिमान व्यक्त केले. यावेळी प्रदीप धवल, प्रमुख अतिथी अनुराधा गोरे, लेखिका संपदा वागळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास ठुसे ,मानद सचिव सौ. विदुला ठुसे व अनेक सेवा भावी संस्थांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास ठुसे यांनी, सूत्रसंचालन संपदा वागळे तर आभार विदुला ठुसे यांनी मानले.