पाचोऱ्यात अखंड नाम, जप, यज्ञने पाचोऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहास उत्साहात सुरुवात

मधुर खान्देश वृत्तसेवा: श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशिर्वादाने व परम पूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार २६ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त पाचोरा शहरातील संघवी काॅलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन १९ एप्रिल पासुन करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी ग्रामदेवता मानसन्मान, मंडल मांडणी करण्यात आली असून २० एप्रिल रविवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने यजमान दिव्य मराठी वृत्तपत्राचे पाचोरा तालुका प्रतिनिधी नंदकुमार शेलकर त्यांचा पत्नी प्रतिभा नंदकुमार शेलकर तसेच गोविंद शेलार व सपत्नीक मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार सेवा रुजू करण्यात आली. आज २१ एप्रिल सोमवार रोजी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, २२ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, चंडी याग, २३ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग, २४ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, गीताई याग, २५ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, मल्हारी याग, शनिवार २६ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार बली पुर्णाहुती, श्री सत्य दत्त पुजा व देवता विसर्जनासह अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे. सामुहिक गुरुचरित्र वाचन सकाळी ८ वाजता होणार आहे. सलग सात दिवस चालणाऱ्या या अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचा जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी सहभागी व्हावुन लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.