नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे सरलाबाई पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा : दि. २२ एप्रिल २०२५: खेडगाव नंदीचे (ता. पाचोरा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सरलाबाई भरतसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामसेवक आबा हरी पाटील यांच्या सूचनेने अध्याशी अधिकारी म्हणून सरपंच प्रदीप जामसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निवडणूक कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच पंढरीनाथ गोविंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य तथा माजी महिला सरपंच स्वाती कैलास कुमावत तसेच सदस्या गंगुबाई अशोक पाटील, दिपक यशवंत पाटील, अनिल पांडुरंग पाटील त्याच बरोबर ग्रामपंचायत कर्मचारी संजय रणसिंग पाटील, दिपक कमलाकर पाटील, सचिन दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ श्रीराम ढमाले,अशोक महाजन उपस्थित होते सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी विकास खैरे,वसीम शेख देखील उपस्थित होते. या नवनिर्वाचित उपसरपंच सरलाबाई पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन  करण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button