भडगावातील तेरा वर्षीय बालकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना!

भडगाव शहरातील आझाद चौकातील दीपक किसन पवार (पांचाळ) यांचा १३ वर्षीय मुलगा दिनेश याचा उष्ाघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनेश दीपक पवार (वय १३)
सु.गि.पाटील विद्यालय भडगाव इ.७वी तील विद्यार्थी याची काल दिनांक २१ रोजी खेळत असताना त्याची अचानक प्रकृती खालावल्याने त्यास उलटी, जुलाबचा त्रास सुरू झाला होता. त्यास प्राथमिक उपचारासाठी भडगाव येथे दाखल करुन अधिक उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता,सायंकाळीं त्याच्या प्रकृती अधिक खालावल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली आहे. यावेळी उपस्थित डॉक्तरानी उष्ाघातामुळे तो मयत झाल्याचे सांगितले असून त्यावर आज दि २२ रोजी जळगाव येथे शविच्छेदनानंतर भडगाव येथे दुपारी १ वाजता शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दिपक पवार यांचा आझाद पारंपरिक पांचाळ काम करण्याचा व्यवसाय असून कुटुंबाची अत्यंत गरिबीची परिस्थिती आहे. दिनेश हा अत्यंत हुशार व हजर जबाबी मुलगा होता. गरिबीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत पुढे मोठे अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. असे कुटुंबाने सांगितले. दिनेश यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहिण काका काकू आजी असा परिवार आहे.