जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा शहरातील कृष्णापुरीची कन्या डॉ. स्वाती नितीन पाटील यांचे वैद्यकीय क्षेत्रात यश!

पाचोरा शहरातील रहिवासी असलेले कृष्णापुरी भागातील स्वाती नितीन पाटील यांनी APM’s आयुर्वेद महाविद्यालय, सायन, मुंबई येथून BAMS पदवी प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून यश मिळवले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉक्टर स्वाती या स्व. नितीन भिला पाटील(माळी) यांची कन्या असून, मुंबई लोकल रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून कार्यरत असलेले श्री. संजय भिला पाटील यांची पुतणी आहेत. त्यांच्या या यशाने कुटुंबासह संपूर्ण कृष्णापुरी भागाला अभिमान वाटत असून डॉ. स्वाती पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शैक्षिणक,राजकीय तसेच मधुर खान्देश वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.