पाचोरा:कृष्णापुरीत हनुमान जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जनसेवा पाणपोईचे उद्घाटन!

मधुर खान्देश वृत्तसेवा: दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी शनिवारी हनुमान जयंतीचे औचित्य साधून सध्या कडक उन्हाळ्यात ग्रामीण भागातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे हाल सहन करावे लागत असतांना कृष्णापुरी परिसरातील जेष्ठ व सुज्ञ नागरिक यांनी एकत्र येऊन एक स्तुत्य उपक्रम म्हणून आज रोजी पाणपोईचे उद्घाटन शांताराम बुधा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी त्यांना सहकार्य म्हणून पोलीस पाटील पती अनिल सावंत सर, रवींद्र भावसार,महादू टेलर,गोपाल सूर्यवंशी, अनिल ( छोटू ) पाटील, दीपक विक्रम पाटील,गजानन पाटील मेडिकल,श्री संजय महाजन रेश्मा टेंट हाऊस,बालू आण्णा महाजन,पांडुरंग दादा धनगर,मनोज माळी आरवे,मयूर महाजन,श्रीकांत बेंडाळे, शांताराम नारायण पाटील,अनिल सूर्यवंशी,सुभाष सूर्यवंशी, मनोज पाटील,बबलू पाटील,रामदास (तात्या) पाटील मोरया टेंट,इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून प्रत्येक दिवशी पिण्याच्या पाण्याची सोय दोन महिने करण्याचा संकल्प देखील कृष्णापुरी येथील नागरिक यांनी केला. याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.