पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील विद्यार्थ्याचे अभिनंदन! आई मजुरी तर वडिलांची शेंगदाणे फुटाणे विक्रीची हातगाडी…. अन् मुलगा झाला GST विभागात हवालदार

• पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लायब्ररीमध्ये नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी…कोणताही क्लास न लावता पोहचला या पदावर….
पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावातील रस्त्यावर शेंगदाणे फुटाणे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या छोटू श्रीराम भोई यांच्या मुलाने सेंट्रल जीएसटी हवालदारच्या पदाची परीक्षा दिली होती त्यामध्ये त्याला यश मिळाले आहे त्या यशाबद्दल त्याचे मित्र परिवाराच्या वतीने फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या पाचोरा नगरपरिषदेअंतर्गत महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाचा नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी असून आमदार किशोर आप्पा पाटील त्याचबरोबर पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.