नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

जळगावात गोळीबारची घटना! पाचोरा पोलिसांनी केले एका हल्लेखोराला फिल्मी स्टाईलने अटक


Advertisements
Ad 4

जळगाव:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत गृह विभागाचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे. या जलद गतीने सुरू असलेल्या कामांमध्ये जळगाव जिल्हा देखील पोलिस अधिक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अग्रेसर बघायला मिळत आहे. यामध्ये जळगाव येथील पिंप्राळा परिसरात जुन्या मित्रांच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती.  सदर घटना घडताच आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला होता. यामध्ये पाचोरा येथे दिनांक 24 एप्रिल 2025 रात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशन जवळ गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचारी योगेश सुरेश पाटील व दिलीप पाटील यांना चार इसम संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना विचारपूस केली असता त्यांनी टाळाटाळ करत त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलीस कर्मचारी योगेश सुरेश पाटील व दिलीप पाटील यांनी त्यांना पोलिसी दाखवत फिल्मी स्टाईलने पकडून त्यांना रिक्षात बसवत असतांना पोलिसांसोबत झटापटी दरम्यान तीन संचयित आरोपींनी अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी पळ काढला आहे. तात्काळ पाचोरा पोलिसांना माहिती दिली असता त्या ठिकाणी गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील त्याचबरोबर वाहन चालक समीर पाटील, भगवान उमाळे, सागर पाटील घटनास्थळी पोहोचले असता पकडून ठेवलेल्या एका आरोपीस पाचोरा पोलिसांनी अटक करून रामानंद नगर, जळगाव पोलिस स्टेशनला सदर अटक केलेल्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी योगेश सुरेश पाटील त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले दिलीप पाटील त्यांच्या सह सोबत गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या बाबत पोलिस विभागाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button