नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात तापमान ४५ अंश सेल्सिअस पार;नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा (जळगाव), दि. २९ एप्रिल २०२५: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट पसरली असून तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाचोरा नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याशी मधुर खान्देशचे संपादक राहुल महाजन यांनी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “उष्णतेच्या या लाटेत नागरिकांनी शक्यतो दुपारी बाहेर जाणे टाळावे. विशेषतः वयोवृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्यावी. पुरेसे पाणी प्यावे आणि सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा.” नागरिकांना नियमित पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर उष्माघातापासून बचावासाठी हलके कपडे घालावेत आणि थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाचोरा नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतर्क असून, आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button