जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील रवींद्र पाटील (मनोज आप्पा) यांची सरपंच ग्राम संवाद असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच रवींद्र उत्तमराव पाटील यांची नुकतीच ग्राम संवाद सरपंच असोसिएशन पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ते गोराडखेडा खुर्द सरपंच पदाचा कार्यभार सांभाळत असून त्यांची ग्राम संवाद सरपंच असोसिएशन तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या कार्यास अधिक बळ मिळणार आहे. सोबतच गावासह परिसरातील समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकारी गोराडखेडा खुर्द, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तथा पदाधिकारी ग्रामपंचायत गोराडखेडा बु, विविध कार्यकारी सोसायटी गोराडखेडा यासह गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.