जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यात शॉट सर्किटमुळे शेतकऱ्याचे मक्का जळून खाक;जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची माहिती.

पाचोरा, दि. 2 मे 2025: पाचोरा तालुक्यातील पारधाडे शिवारात रेल्वे गेटजवळ शेतकरी दत्तू हरी पाटील यांच्या गट क्रमांक 12/1 मधील शेतात शॉट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे 70 क्विंटल मक्का जळून खाक झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, प्रथमदर्शनी शॉट सर्किट मुळे आग लागण्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.प या आगीमुळे शेतकरी दत्तू पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम लवकरच करण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमान 45°c च्या पार जात असून शेतकऱ्यांनी शॉट सर्किटसारख्या घटना टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिकांनी प्रशासनाला केले आहे.
