नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्या

एम. एम. कॉलेज पाचोरा येथे १०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप


Advertisements
Ad 4

पाचोरा (प्रतिनिधी):
येथील एम. एम. महाविद्यालयात प्रबोधन प्रतिष्ठान पुणे व सावित्री शक्तीपीठ पुणे (शाखा पाचोरा) यांच्या संयुक्त विद्यमाने एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १०० गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना एमपीएससी (MPSC) स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. ही संकल्पना अ‍ॅडव्होकेट भाग्यश्री महाजन यांची होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे माजी सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. बी. एच. जाधव (धुळे) हे होते. यावेळी प्रा. एस. बी. महाजन (रावेर) आणि राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि यशाची गुरुकिल्ली या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी आरपीआयच्या महिला अध्यक्षा प्रियांका सोनवणे, प्राध्यापक एस. बी. महाजन, आर. पी. बागुल, सईद पंजाबी, अनिस खान, डॉ. संजय माळी, डॉ. अतुल महाजन, हाजी असलम, लिबास बिल्डर, डॉ. जी. एस. महाजन, मिलिंद सोनवणे, डॉ. प्रवीण माळी, राजाराम आप्पा सोनार, उपप्राचार्य डॉ. वले आणि प्रकाश महाजन यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील गोरख ब्राह्मणे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन के. एस. महाजन यांनी केले. प्रबोधन प्रतिष्ठान आणि सावित्री शक्तीपीठ यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांकडून कौतुक होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button