पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनावर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दिली जोरदार धडक! पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू…खाली व्हिडिओ बघा

पाचोरा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई करणाऱ्या तहसील प्रशासनाच्या पथकावर १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाळू माफियांनी वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने शासकीय वाहनास जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तहसीलदारांनी अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक रात्री तालुक्यात गस्त घालत असताना, त्यांना अवैध वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर दिसून आला. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅक्टर चालकाने पथकाच्या शासकीय वाहनाला जाणीवपूर्वक आणि वेगाने धडक दिली. या भीषण धडकेत शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून, पथकातील कर्मचारी सुखरूप आहेत.
या पथकात खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सचिन मोरे (पथक प्रमुख) राजेंद्र शिरसाट तसेच अतुल पाटील,ततेराव सपकाळ,सागर मोरे कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होत असून महसूल विभागात संताप व्यक्त होत आहे. सदर घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ट्रॅक्टर चालकाचा शोध घेतला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.






