नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य

पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा आमदारांच्या उपस्थितीत सत्कार!डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा


Advertisements
Ad 4

पाचोरा: येथील पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आज दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुनीता पाटील तसेच उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे प्रतिनिधी आणि शहरातील नामवंत डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ. जीवन पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. भरत पाटील, डॉ. झाकीर देशमुख, डॉ. दिनेश सोनार, डॉ. विजय जाधव, डॉ. अतुल पाटील, डॉ. चंद्रकांत विसपुते, डॉ. राहुल पटवारी, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. मुकेश तेली, डॉ. कुणाल पाटील, डॉ. बालकृष्ण पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. चेतन राजपूत, डॉ. किरण राजपूत, डॉ. प्रशांत शेळके, डॉ. दिपक चौधरी आणि डॉ. व्यंकटेश जोशी यांचा समावेश होता.

केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता, या कार्यक्रमात शहरातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडित विविध प्रश्नांवरही ऊहापोह करण्यात आला. पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या व अडचणींबाबत आमदार किशोर पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून
डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. असोसिएशनच्या प्रलंबित कामांबाबत प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यामुळे शहरातील डॉक्टरांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनीही डॉक्टरांच्या स्नेहाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व शहराच्या विकासासाठी वैद्यकीय क्षेत्राचे सहकार्य मोलाचे असल्याचे नमूद केले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button