नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

पाचोरा-जळगाव महामार्गावर जमिनीचे भाव गगनाला; हडसन-खेडगाव नंदीचे पट्ट्यात एकरी ९० लाखांचा सौदा? नाशिकचे मोठ्या व्यापाऱ्यांची पाचोऱ्यात एन्ट्री? उद्योग व्यवसाय वाढणार


Advertisements
Ad 4

पाचोरा: पाचोरा ते जळगाव या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होत असतानाच, या परिसरातील जमिनींच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः हडसन ते खेडगाव नंदीचे दरम्यान असलेल्या जमिनींना आता ‘कोटी’चे भाव फुटले असून, या भागात गुंतवणुकीसाठी परगावाहून व्यापारी येत असल्याचे चित्र आहे.
टोल नाक्यामुळे वाढले महत्त्व
नॅशनल हायवे अथॉरिटीतर्फे हडसन गावाजवळ टोल नाका प्रस्तावित असून महामार्गाचे रुंदीकरण आणि नियोजित टोल नाका यामुळे या परिसराला व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाले आहे. टोल नाक्याच्या आजू बाजूच्या एक किलोमीटर अंतर सोडून आसपास पेट्रोल पंप, हॉटेल्स, कंपन्या,लॉजिस्टिक्स पार्क आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने उभारण्याची शक्यता असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे.

नाशिकच्या व्यापाऱ्याकडून ९० लाखांची ऑफर?

सध्या परिसरात एका मोठ्या व्यवहाराची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडगाव नंदीचे आणि हडसनच्या दरम्यान असलेल्या एका शेतजमिनीचा व्यवहार तब्बल ९० लाख रुपये प्रति एकर या दराने झाला आहे. नाशिक येथील एका मोठ्या व्यापाऱ्याने ही जमीन बघितल्याचे चर्चिले जात आहे.

गुपित व्यवहार: या व्यवहाराने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, नेमका व्यवहार कोणत्या शेतकऱ्याचा झाला आणि खरेदीदार कोण आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. गोपनीयतेमुळे या व्यवहाराबाबत केवळ चर्चाच रंगताना दिसत आहेत.

शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस?
रस्त्याच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या असल्या तरी, उरलेल्या जमिनींचे भाव वाढल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र, जमिनी विकताना फसवणूक होऊ नये आणि बाजारभावाचा अचूक अंदाज घेऊनच व्यवहार करावेत, असे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button