नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्या

चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १२ लाख ९१ हजारांच्या अवैध मद्यासह ‘अर्टीगा’ जप्त


Advertisements
Ad 4

चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील देवळी शिवार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एका आलिशान चारचाकी वाहनावर धाड टाकली. या कारवाईत दमण बनावटीच्या विदेशी मद्यासह एकूण १२ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, धुळे जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि नाशिक विभागाच्या उप आयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. चाळीसगाव विभागाचे निरीक्षक के. एन. गायकवाड यांना १२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, एका पांढऱ्या रंगाच्या अर्टीगा कारमधून अवैध मद्याची तस्करी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक के. एन. गायकवाड व दुय्यम निरीक्षक (बीट क्र. ०१) यांनी देवळी शिवार परिसरात सापळा लावला. संशयास्पद वाटणाऱ्या मारुती सुझुकी अर्टीगा (क्र. MH-१८, CE-८३०३) या वाहनाची झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आणि केवळ दमण येथे विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला असून यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की: १७४ बाटल्या (किंमत ४३,५०० रुपये), इम्पेरिअल ब्लू व्हिस्की: ९६ बाटल्या (किंमत २१,१२० रुपये), मॅकडॉल नं. १ व्हिस्की: ८४ बाटल्या (किंमत १८,४८० रुपये), मारुती अर्टीगा कार: (अंदाजे किंमत १२,००,००० रुपये) तर मोटोरोला आणि ओप्पो कंपनीचे २ मोबाईल (किंमत ८,००० रुपये) असा एकूण किंमत: १२,९१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाहनचालक सचीन भिकन पाचपुते (२७) आणि मिथुन महादु मोरे (४०), (दोघे रा. विंचूर, ता. जि. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने बजावली कामगिरी
ही यशस्वी कारवाई अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के. एन. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. डी. बागले, जवान बी. एन. पाटील, व्ही. बी. परदेशी आणि वाहन चालक एम. डी. पाटील यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button