नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य

नगरदेवळा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू; वारसांचा शोध सुरू


Advertisements
Ad 4

चाळीसगाव (मधुर खान्देश वृत्तसेवा): | चाळीसगाव जवळील नगरदेवळा रेल्वे स्थानकावर एका अनोळखी महिलेचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे चाळीसगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस मृत महिलेच्या वारसांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील किलोमीटर क्रमांक ३५३/१०-१२ जवळ, अप प्लॅटफॉर्म लाईनवर एका धावत्या रेल्वेखाली कटल्यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्टर यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था छिन्नविछिन्न झाली असून अद्याप तिची ओळख पटू शकलेली नाही.
महिलेचे वर्णन खालीलप्रमाणे:
वय: अंदाजे ५५ वर्षे.
बांधा: मजबूत, रंग गहूवर्ण.
चेहरा: गोल, नाक सरळ
उंची साधारण ५ फूट.

  • केस: काळे आणि लांब.
  • पेहराव: अंगात काळ्या रंगाच्या परकरचे फाटलेले तुकडे आणि रक्ताने माखलेला तपकिरी रंगाचा ब्लाऊज.
  • ओळख पटवण्यासाठी खूण: डाव्या हाताच्या मनगटाजवळ ‘स्टार’ (चांदणी) चे चित्र गोंदलेले आहे.
    या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक १५/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

आवाहन:
वरील वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास किंवा कोणाचे नातेवाईक बेपत्ता असल्यास, त्यांनी तातडीने लोहमार्ग पोलीस ठाणे, चाळीसगाव येथे किंवा पोलीस हवालदार निलेश महाजन यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८८०६७२४१७३ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button