नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्यामनोरंजन

पाचोऱ्यात ३ मार्चला ‘पोलीस चषक-२०२६’ क्रिकेट स्पर्धेचा थरार; प्रशासकीय विभागांचे संघ भिडणार! पत्रकारांचाही संघ सामील


Advertisements
Ad 4

पाचोरा येथे प्रशासकीय कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे आगामी ३ मार्च २०२६ रोजी ‘पोलीस चषक क्रिकेट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. शहरातील एस. एस. एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ८ वाजेपासून या क्रीडा महोत्सवाचा श्रीगणेशा होणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. “आपले शरीर सुदृढ व निरोगी राहावे,” हा मुख्य संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम व पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या थेट देखरेखीखाली या भव्य आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. ही स्पर्धा टेनिस बॉल (कास्को) वर खेळवली जाणार असून, यात शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या ६ विभागांचे क्रिकेट संघ आपसात भिडतील. स्पर्धेचे दोन गट (Groups) पाडण्यात आले आहेत:ग्रुप ‘ए’ (Group A)ग्रुप ‘बी’ (Group B)१. महावितरण क्रिकेट संघ१. पाचोरा पोलीस क्रिकेट संघ२. डॉक्टर क्रिकेट संघ२. महसूल विभाग क्रिकेट संघ३. नगरपालिका क्रिकेट संघ३. पाचोरा पत्रकार क्रिकेट संघ स्पर्धेतील प्रत्येक सामना हा ८ षटकांचा (Overs) असेल. चुरशीच्या या लढतींमध्ये कोणता संघ बाजी मारून ‘पोलीस चषक’वर आपले नाव कोरणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

वेळ: सकाळी ८:०० वाजल्यापासून | स्थळ: एस. एस. एम. एम. महाविद्यालय मैदान, पाचोरा

या स्पर्धेच्या निमित्ताने प्रशासनातील विविध विभागांमध्ये समन्वय आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. तरी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रीडा रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button