पाचोरा आगारातून सकाळी सुटणारी कुऱ्हाड लोहारा बंद केलेली बस सेवा पूर्ववत करा!

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा आगाराची ७.१५ वाजता सुटणारी पाचोरा- लोहारा मोहाडी मार्गे जळगाव तसेच पुन्हा जळगावहून सांयकाळी ५.०० वाजता सुटणारी जळगांव, नेरी मोहाडी मार्गे लोहारा पाचोरा एस.टी. बस फेरी पुर्ववत सुरू करण्यांबाबत जळगाव राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठांकडे पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश वंजी पाटील यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध पाचोरा तालुक्यातील शांताराम उर्फ आण्णा दगडु बेलदार यांच्या वतीने तक्रार करत निवेदन देण्यात आले आहे. सदर लोहारा गावाची लोकसंख्या १५ ते २० हजार असुन, लोहारा ता.पाचोरा येथुन जळगांवला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तसेच जेष्ठ नागरीकांना सकाळी पाचोरा आगारातुन ७.१५ वाजता सुटणारी व लोहारा ता.पाचोरा येथे सकाळी ८.१५ ला पोहचणारी एस.टी.बस व परतिच्या प्रवासासाठी सांयकाळी जळगांव आगारातुन ५.०० वाजता सुटणारी जळगांव, लोहारा पाचोरा या मार्गावर बस सेवा सुमारे ८ दिवसांपासुन पाचोरा आगार प्रमुख प्रकाश वंजी पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे बस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. सध्या अक्षय तृतीया (आखाजी) सणानिमीत्त सासरवासीण महीला माहेराला जाण्यासाठी बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी तसेच अवैध पणे वाहतुन करणाऱ्या वाहनांचा वापर करावा लागत आहे. याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुक ही राजरोजपणे सुरू आहे. त्यामुळे एखादयावेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी वाहनाने महीलांप्रवाशी यांना कोंबुन कोंबुन प्रवास करावा लागत असुन खाजगी वाहन चालकांची मनमानी व भाडे अव्वाच्या सव्वा घेत असल्याने व सर्व प्रवाश्यांवर एक प्रकारचा अन्याय होत असुन सदर बस सेवा सुरू करण्याबाबत पाचोरा रा.प. आगार व्यवस्थापक श्री. प्रकाश वंजी पाटील यांना दि.०३/०५/२०२५ रोजी समक्ष भेट घेतली असता सदर आगार व्यवस्थापक यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यात त्यांनी म्हटले की, एस.टी. बस संख्या कमी असल्या कारणाने व चार एस टी बस गाडया स्कॅप मध्ये दिलेल्या असल्याने तसेच सदर बसला प्रवासी संख्या कमी असल्या कारणाने सदर बस सेवा ही बंद करण्यात आलेली आहे. परंतु नागरिकांची गैरसोय लक्षात घेता सदर सुरू असलेल्या बस सेवा पूर्व सुरू कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे.






