नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्य

पाचोरा शहरात विकासाचा धडाका: ४ प्रभागांतील रस्ते कामांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन!


Advertisements
Ad 4

पाचोरा (मधुर खान्देश): शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून वॉर्ड क्रमांक १, ८, ९ आणि १० मधील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी या चारही प्रभागांतील रस्ते विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त होते. या नवीन रस्ते कामांमुळे नागरिकांची वाहतूक सुलभ होणार असून, पावसाळ्यात होणारा चिखल आणि पाण्याचा निचरा यांसारख्या समस्या कायमच्या दूर होणार आहेत. सुरक्षित आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि विकासात भर पडणार आहे.
यावेळी आमदारांसोबत शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने सुमित पाटील (गट नेते), किशोर आप्पा बारवकर,गणेश बापू पाटील,नंदू दादा पाटील,दादू वकील,किशोर पाटील,सुमित सावंत,विकी बाविस्कर, संजय एरंडे
यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, “शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देऊन पाचोरा शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” या कामांमुळे संबंधित प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button