नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यसंपादकीय

पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ५ मार्चपासून अध्यात्माची पर्वणी


Advertisements
Ad 4

वेरुळी खुर्द (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील श्री क्षेत्र वेरुळी खुर्द येथे ‘श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन’ आणि ‘श्री संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज जलसमाधी सोहळा’ पर्वणीचे औचित्य साधून भव्य अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तसेच संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ मार्च २०२६ पासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यात नामवंत कीर्तनकारांच्या वाणीतून भाविकांना अध्यात्माची मेजवानी मिळणार आहे.
या सप्ताहात दररोज रात्री विविध महाराजांची कीर्तने होतील. यामध्ये प्रामुख्याने देवगोपाल महाराज शास्त्री,विष्णूजी महाराज भोलाणेकर,पांडुरंग महाराज,आवारकर,मनोज महाराज ऐनगावकर,पांडुरंग महाराज महालपुर,योगी दत्तनाथ महाराज (गोरक्षनाथ आखाडा, शिंदखेडा),पोपटजी महाराज कासारखेडेकर
या सोहळ्याची सांगता गोविंद महाराज (पाचोरा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
सप्ताहाच्या समारोपप्रसंगी, गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या धार्मिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वेरुळी खुर्द ग्रामपंचायत कमिटी, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, वेरुळी येथील समस्त भजनी व ग्रामस्थ मंडळी, पाताळेश्वर भक्त मंडळ, एकविरा मंदिर मंडळ तसेच गुरुदेव दत्त मंदिर सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button