लहान लेकराप्रमाणे सांभाळलेल्या पाळीव कुत्र्याची चोरी; डॉक्टर मालकाचे शोधण्यासाठी कळकळीचे आवाहन!

धुळे:लहान लेकराप्रमाणे सांभाळलेल्या आपल्या मुक्या प्राण्यावर असलेल्या जिवापाड प्रेमापोटी, एका डॉक्टरने आपल्या हरवलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण प्रशासन आणि सोशल मीडियाला साकडे घातले आहे. एरंडोल (उत्राण) येथील रहिवासी आणि सध्या दिल्ली येथे कार्यरत असलेले डॉक्टर विशाल कोळी यांचा पाळीव कुत्रा अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण (मोघन) येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर विशाल कोळी हे आपल्या गावी कामानिमित्त आले होते. मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, हेंद्रुण मोघन शिवारातील शेतातून घरी परतत असताना ही घटना घडली. एका अज्ञात इसमाने त्यांच्या पाळीव कुत्र्याला फूस लावून किंवा जबरदस्तीने पळवून नेल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले आहे. डॉक्टर विशाल कोळी हे व्यवसायाने डॉक्टर असून सध्या ते दिल्ली येथे स्थित आहेत. आपला लाडका कुत्रा हरवल्याचे समजताच त्यांनी दिल्लीतूनच विविध माध्यमातून शोध सुरू केला आहे. त्यांनी अनेक परिचित व्यक्तींना फोन करून आणि सोशल मीडियाचा वापर करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप कुत्र्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
- पाळीव कुत्रा (फोटो/व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे)
- हरवल्याचे ठिकाण: हेंद्रुण मोघन शिवार, जि. धुळे.
- वेळ: ३ मार्च २०२६, सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास.
“हा कुत्रा केवळ प्राणी नसून आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे. त्याला आम्ही पोटच्या लेकराप्रमाणे जपले आहे. जो कोणी या कुत्र्याला शोधून देईल किंवा माहिती देईल, त्याचे आम्ही कायम ऋणी राहू.”
— डॉ. विशाल कोळी
जर आपल्याला फोटोमध्ये दिसणारा कुत्रा कुठेही आढळून आला किंवा त्याबद्दल काहीही माहिती मिळाली, तर खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कोळी यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक:9891146223 | 9650927369





