नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणशैक्षणिक

आव्हानांतून गरुडझेप: डॉ. सुवर्णा पाटील यांना पीएच्.डी. प्रदान; महिलांच्या मानसिक स्वास्थ्याचा जागर!


Advertisements
Ad 4

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा): आजच्या आधुनिक युगात स्त्रीने चूल आणि मूल या पलीकडे जाऊन अंतराळापासून प्रशासनापर्यंत सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. मात्र, ही प्रगती साधताना महिलांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रतिपादन पाचोरा येथील श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुवर्णा राजेंद्र पाटील यांनी केले. जागतिक महिला दिन आणि त्यांना नुकतीच प्राप्त झालेली पीएच्.डी. पदवी या निमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रा. सुवर्णा पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच पीएच्.डी. पदवी प्रदान करण्यात आली. साक्री येथील डॉ. जयप्रकाश चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्यावर नोकरीच्या संस्कृतीचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर सखोल शोधप्रबंध सादर केला.

पोलीस दलातील आव्हानात्मक नोकरीचा त्यांच्या कौटुंबिक आणि आरोग्यावर होणारा परिणाम त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोना


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button