पाचोरा तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न.

मधुर खान्देश वृत्तसेवा: महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित खरीप हंगाम नियोजन व आढावा कार्यशाळा सन 2025 कार्यक्रम दि. 6 मे 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी आवारात फळ रोपवाटिका, गिरड रोड,पाचोरा येथे तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमात पाचोरा तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद यांनी तालुका कृषी अधिकारी पाचोरा रमेश जाधव यांच्या संकल्पनेतून उस्फुर्त सहभाग नोंदवत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे प्रात्यक्षिके प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर आयोजित केली होती. त्यामध्ये, मूलस्थानी जलसंधारण, सी आर ए तंत्रज्ञान, नाडेप व गांडूल युनिट, माती नमुना काढणे, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, बियाणे उगवण क्षमता चाचणी, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन असे विविध प्रात्यक्षिके प्रक्षेत्रावर आयोजित केली होती याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी कृषी विभागातील चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांनी पीपीटी द्वारे खरीप हंगाम नियोजन व आढावा याचे सादरीकरण केले. पी एम एफ जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील यांनी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यशाळेमध्ये विविध खाजगी कंपन्यांनी देखील स्टॉल लावून सहभाग नोंदवला त्यात बेल्जियम फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, महाधन फर्टीलायझर, जैन इरिगेशन सिस्टीम जळगाव, निर्मल सीड्स पाचोरा, कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद, तालुका फलरोपवाटिका पाचोरा यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी तालुक्याचे किशोर आप्पा पाटील हे होते , मार्गदर्शक म्हणून श्री कुरबान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव तर प्रमुख उपस्थिती म्हणून पद्मनाथ म्हस्के कृषी विकास अधिकारी जि प जळगाव, श्री भूषण अहिरे उपविभागीय अधिकारी पाचोरा, श्री किशोर मांडगे उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा हे होते. व विविध कृषि पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रवीण भाऊ पाटील, मयूर पाटील,सुनील पाटील तसेच तालुक्यातील प्रमुख पत्रकार बांधवदेखील उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी निविष्ठा विक्रेते असोशियन, ड्रिप डीलर असोसिएशन यांचे सहकार्य लाभले आहे.