पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी येथे गेष्णा ब्युटी पार्लरचा शुभारंभ; जान्हवी मॅडम चाळीसगावकर यांच्या हस्ते उद्घाटन! ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला बळ


खेडगाव नंदीचे (पाचोरा):आजच्या धावपळीच्या युगात महिला केवळ चूल आणि मुलापुरत्या मर्यादित न राहता,उद्योग-व्यवसायात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च २०२६ रोजी गेष्णा ब्युटी पार्लर व लग्न सराईच्या साहित्याच्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला.
या नवीन व्यवसायाचे उद्घाटन मान्यवर सौ. जान्हवी मॅडम चाळीसगावकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी खेडगाव नंदीचे व परिसरातील महिलांची उपस्थिती होती. गोरडखेडा येथील प्रसिद्ध फोटोग्राफर संदीप पाटील यांच्या पत्नी सौ. वैशाली संदीप पाटील यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले आहे. या दालनात महिलांसाठी ब्युटी पार्लरच्या सुविधांसह लग्न समारंभासाठी लागणारे अद्ययावत साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिलांना शहराच्या ठिकाणी न जाता दर्जेदार सेवा गावातच उपलब्ध व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे संचालिका सौ. वैशाली पाटील यांनी सांगितले. या उद्घाटनप्रसंगी ‘मधुर खान्देश’चे संपादक राहुल महाजन आणि त्यांचे सहकारी योगेश महाजन यांनी या नवीन दालनास सदिच्छा भेट दिली. ग्रामीण भागातील भगिनींनी अशा प्रकारे व्यावसायिक क्षेत्रात भरारी घेणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत त्यांनी सौ. वैशाली संदीप पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या नवीन उपक्रमाचे स्वागत करत सौ. पाटील यांचे अभिनंदन केले आहे.





