नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याशैक्षणिक

पाचोरा: महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची निवड


Advertisements
Ad 4

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा) :शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी ‘महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती’च्या अध्यक्षपदी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल येथे जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि समाजबांधवांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यावेळी आगामी जयंती उत्सवाच्या रूपरेषेबाबत सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीत समितीने खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत:

  • भव्य रॅली: ११ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता कृष्णापुरी येथील मारुती मंदिरापासून महात्मा फुले स्मारकापर्यंत भव्य रॅली काढण्यात येईल.
  • जयंती मिरवणूक: ११ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
  • प्रबोधनात्मक व्याख्यान: महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु-शिष्यांच्या विचारांचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी १० किंवा १२ एप्रिल रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीसाठी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात सुदर्शन महाजन, नगरसेवक अशोक पाटील, संतोष महाजन, नगरसेवक प्रदीप वाघ, कन्हैया देवरे, सामाजिक कार्यकर्ते खलील दादा देशमुख, शरद गीते, गंगाराम तेली, रवींद्र बळीराम महाजन, नाना सांडू महाजन, प्रवीण पाटील, नथू महाजन, चिंधु मोकळ महाजन, संजय पाटील, जिभाऊ पाटील, नितीन पाटील, प्रमोद महाजन, भूषण पाटील, सुनील दिलीप महाजन, दिनेश महाजन, तेजस जगताप, गजानन महाजन, पत्रकार राहुल महाजन, पत्रकार नंदू भाऊ शेलकर, हर्षल खामकर, चेतन महाजन, गणेश पाटील, शुभम महाजन, सुनील पाटील सर, पत्रकार योगेश पाटील, पत्रकार अनिल येवले, विजय जाधव, भूषण चौधरी, सुनील महाजन, वीरेंद्र पाटील, शरद पाटील, डॉ. संजय जाधव, रवींद्र महाजन, दिलीप महाजन, विठ्ठल महाजन, कमलेश महाजन यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button