नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्य

पाचोरा: दिघी येथील ‘जगदंबा महिला बचत गटा’चा रेशन परवाना निलंबित; अनामत रक्कम जप्त


Advertisements
Ad 4

पाचोरा (प्रतिनिधी):
तालुक्यातील दिघी येथील स्वस्त धान्य दुकानदार ‘जगदंबा महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गट’ यांच्याविरुद्ध प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. शासकीय धान्य साठ्यात तफावत आढळून आल्याने या दुकानाचे प्राधिकारपत्र (परवाना) तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, दुकानाची १००% अनामत रक्कम शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिघी येथील रेशन दुकानाबाबत स्थानिक ग्रामपंचायत बॉडी आणि सरपंचांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केली असता, प्रत्यक्ष साठा आणि दप्तरी नोंद यामध्ये मोठी तफावत दिसून आली होती. याबाबतचा अहवाल तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी राहुल पवार यांनी वरिष्ठ कार्यालयास पाठवला होता.

या गंभीर अनियमिततेमुळे महाराष्ट्र अनुसूचित वस्तू अधिनियम (वितरणाचे विनियमन) आदेश, १९७५ मधील कलम १८, १८(d) आणि (d-1) नुसार खालील कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत संबंधित बचत गटाचे रेशन दुकान चालवण्याचे अधिकार गोठवण्यात आले आहेत. दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली आहे. धान्य साठ्यात जी तफावत आढळली आहे, त्या तुटीच्या रकमेची निश्चिती करून, तपासणीच्या दिनांकापासून ते प्रत्यक्ष वसुलीच्या दिनांकापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेच्या व्याजदराने आकारणी केली जाणार आहे. ही सर्व रक्कम चलनाव्दारे शासनास जमा करण्याचे आदेश पारित झाले आहेत.

ग्रामपंचायतीच्या तक्रारीची दखल

गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी रेशन वितरणातील त्रुटींबाबत सातत्याने आवाज उठवला होता. या रेशन दुकानाबाबत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी देखील जिल्हा पुरवठा अधिकारी यांना योग्य ती चौकशी करून आपण कारवाई करावी असे देखील सुचित केले होते. तसेच मधुर खान्देश न्यूजच्या सोशल मीडियावर बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या तसेच नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे माध्यमातून देखील लोकप्रतिनिधींच्या या तक्रारीनंतर प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईमुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्यांच्या हक्काच्या धान्यात अफरातफर करणाऱ्यांविरुद्ध ही एक मोठी चपराक मानली जात आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button