नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

पाचोरा न्यायालयाचा निकाल! मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपींना कारावास; पोलीस पथकाचा गौरव


Advertisements
Ad 4

पाचोरा (राहुल महाजन,पत्रकार):
पाचोरा येथील मेहेरबान न्यायालयात पाच वर्षांपूर्वीच्या एका मारहाणीच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे. न्यायाधीश एस. व्ही. निमसे यांनी आरोपींना विविध कलमान्वये दोषी ठरवत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या यशस्वी पैरवीबद्दल जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव केला आहे. सन २०२० मध्ये पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गु.र.नं. २१७/२०२० नुसार, फिर्यादी गौतम किसन अहिरे यांनी आरोपी साहेबराव किसन अहिरे व इतर २ यांच्याविरुद्ध गंभीर मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. या प्रकरणाचा खटला (Rcc No : २५०/२०२०) पाचोरा न्यायालयात सुरू होता. दिनांक १२/०१/२०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे आरोपींना CRPC २४८(२) नुसार दोषी ठरवले. भा.द.वि. कलम ३२६ नुसार ६ महिने सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास).

  • भा.द.वि. कलम ३२४: ३ महिने साधा कारावास आणि ५०० रुपये दंड (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास). • भा.द.वि. कलम ३२३: १ महिना साधा कारावास आणि ३०० रुपये दंड (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास). • कलम ५०४ व ५०६: या कलमांतून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता चंद्रकांत अ. नाईकवाडे, वि. सहा. सरकारी अभियोक्ता प्रशांत भावसार आणि ॲड. करुणाकर ब्राह्मणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला असून पैरवी अधिकारी हवालदार दिपक पाटील तसेच विकास सूर्यवंशी यांनी केलेल्या उत्कृष्ट पाठपुराव्यामुळे आरोपींना शिक्षा लागली आहे. या प्रक्रियेत पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button