नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीय

पाचोरा: भाजपच्या दोन दिवसीय प्रशिक्षण महाअभियानाचा उत्साहात प्रारंभ


Advertisements
Ad 4

पाचोरा: भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या वैचारिक सक्षमीकरणासाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे आयोजन निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आले आहे. जळगाव पश्चिम जिल्हा भाजपाच्या नगरदेवळा व पिंपळगाव मंडळातील कार्यकर्त्यांसाठी हे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भारत माता, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमा पूजनाने शिबिराचा प्रारंभ झाला असून सात सत्रांमध्ये भाजपाचा इतिहास, कार्यविस्तार, सोशल मीडियाचा वापर, अंत्योदय आणि बूथ व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, वैशालीताई सूर्यवंशी, अमोल शिंदे, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, डी. एम. पाटील यांसह स्थानिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाद्वारे कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रनिष्ठ विचारसरणी आणि प्रभावी कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिबिरातील मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button