नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

समता सैनिक दल मजबूत करणे ही काळाची गरज; पाचोऱ्यात भव्य बाईक रॅलीने वेधले लक्ष


Advertisements
Ad 4

पाचोरा (प्रतिनिधी):”समता सैनिक दल ही एक ध्येयवादी संघटना असून, ‘गाव तिथे शाखा – घर तिथे सैनिक’ या ब्रीदवाक्याप्रमाणे ती प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे. देशात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी समता सैनिक दल मजबूत करणे ही आजच्या काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी केले.

समता सैनिक दलाच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त १३ मार्च २०२६ रोजी पाचोरा शहरात भव्य बाईक व पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरवर्षाप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. रॅलीची सुरुवात जारगाव चौफुली येथून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून झाली. मुख्य मार्गावरून निघालेली ही रॅली रेल्वे स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ विसर्जित झाली. रॅलीत केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुण आणि महिला मोठ्या संख्येने स्वयंप्रेरणेने सहभागी झाल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पार पडली. पाचोरा शहर पोलीस व वाहतूक शाखेने चोख बंदोबस्त ठेवला होता. रॅलीच्या समारोपप्रसंगी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याने उपस्थितांमध्ये नवा उत्साह भरला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारिणी, तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे यांनी सर्वांचे आभार मानले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button