नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्य

धरणगाव:टहाकळी येथे ‘कायदा प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात संपन्न


Advertisements
Ad 4

धरणगाव (प्रतिनिधी) – नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने टहाकळी येथे आयोजित करण्यात आलेले ‘कायदा प्रशिक्षण शिबिर’ उत्साहात पार पडले. के. सी. ई. सोसायटीच्या एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव यांच्या विधी चिकित्सालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता टहाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांना विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून हुंडाबळी, कौटुंबिक हिंसा, फसवणूक, भोंदू बाबांकडून होणारी पिळवणूक यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश आशिष सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रमोद एन. पाटील हे होते. तर तालुका विधी सेवा प्राधिकरण, धरणगावचे सचिव किशोर वानखेडे यांची विशेष उपस्थिती लाभली. या उपक्रमासाठी टहाकळी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सरपंच सौ. सविता सुरेश कोळी, उपसरपंच मधुकर सुकदेव पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजय गंगाराम जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. योगेश महाजन, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. डॉ. विजेता सिंग, भूषण चौधरी यांच्यासह वकील संघाचे सदस्य व जिल्हा परिषद शिक्षक शांताराम पाटील आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. योगेश महाजन यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

या शिबिरामुळे नागरिकांच्या कायदेविषयक शंकांचे निरसन होऊन कायद्याबद्दलची भीती दूर होण्यास मोठी मदत झाली असून, अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button