जळगाव जिल्हाताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव


मधुर खान्देश वृत्तसेवा:(मुंबई) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांपैकी पहिल्या तीन जिल्हाधिकारी तसेच अधीक्षकांना गौरव करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा तिसरा क्रमांक तर पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांचा देखील तिसरा क्रमांक आल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुबंईत गौरव केला आहे. याप्रसंगी जळगावचे पालकसचिव व महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते.