शेतकऱ्यांची अडवणूक केली तर याद राखा;पाचोरा आमदार किशोर पाटील ग्रामसेवकांवर आक्रमक

• शेतकऱ्यांच्या कामांमध्ये कमिशन, लाज वाटली पाहिजे यांना…..शेत पाणंद संदर्भातील बैठकीत आमदार किशोर आप्पांनी झाप…झाप….झापले
• तुमची रिटायरमेंट असेल तर घरी बसा शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत गांभीर्याने घ्या….
मधुर खान्देश वृत्तसेवा: दिनांक ७ मे २०२५ रोजी पाचोऱ्यात व्यापारी भवन येथे शेत पाणंद रस्त्यांसंदर्भात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी विभागाचे प्रांत अधिकारी भूषण अहिरे तसेच तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोनाट त्याचबरोबर पंचायत समितीचे बीडिओ देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शेतकऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना साखळे घालत आमचे विविध कामे मार्गे लावा याबाबत विचारणा केली व ग्रामसेवकांच्या वतीने शेतकऱ्यांची कामे होत नाही मागील तीन वर्षांपासून मंजूर करण्यात आलेले कामे पाचोरा तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून मार्गी लागलेच नाही असे विविध आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी तर एक कंत्राटी कामगार असलेल्या कर्मचाऱ्याने आमच्याकडे टक्केवारीची मागणी केली असल्याची माहिती बैठकीत सांगितली आहे. या ग्रामसेवकासह कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे सरकार शेतकरी तसेच नागरिकांचे आहे. शेतकऱ्यांची विविध काम मार्गी लागली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसीय सुधारणा कार्यक्रमात शेतकरी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वांचे विषय मार्गी लागावे म्हणून शासन मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करत आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करून पैशाची मागणी करत असल्याचे देखील या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे. सदर कंत्राटी बेसिसवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी असे देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधु भाऊ काटे पदमसिंह पाटील, रावसाहेब पाटील,किशोर बारवकर तसेच आदी उपस्थीत होते.