नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सन्मान!


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: दि. ८ मे २०२५ रोजी जिल्हा विकास समन्वय व दिशा समितीच्या २०२४/२५ चा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृह जळगाव येथे पार पडला आहे. यावेळी जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभामध्ये एकूण १३० अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यामध्ये पाचोरा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांना फलोत्पादन विषयक उत्कृष्ट कामगिरी साठी गौरविण्यात आले. त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा पदभार स्व पदाचा पदभार सांभाळून अतिरिक्त स्वरूपात सांभाळला होता तसेच पाचोरा उपविभागामध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबागेचे एकूण लक्षांक ७२० हेक्टर असताना ११२१ हेक्टर स्वाध्य करून दाखवले होते म्हणजेच त्यांनी लक्षांकाच्या १५५ टक्के इतके काम करून जिल्ह्यामध्ये आदर्श तयार केला होता. तसेच त्यांनी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी मध्ये जिल्ह्यात आदर्श तयार केलेला असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली असून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरणाच्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button