नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा नगरपरिषद, रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद


Advertisements
Ad 4

पाचोरा:येथील पाचोरा नगरपरिषद, रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियान” दिनांक 14 मे 2025 बुधवार रोजी सकाळी 8 ते 12 वाजेदरम्यान हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे आयोजीत करण्यात आलेले होते. सदरच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळालेला असून यात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी, दुर्गेश सोनवणे नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी, शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.गोरख महाजन, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, प्रदिप पाटील, निलेश कोटेचा, डॉ.मुकेश तेली, डॉ.अजयसींग परदेशी, डॉ.अमोल जाधव व डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी / सदस्य उपस्थित होते. तसेच रेड प्लस सोसायटी, जळगांव या रक्तपेढी तर्फे डॉ.रविंद्र पाटील, डॉ.अमोल पाटील, डॉ.दिपक पाटील, परिचारीका कु.वैष्णवी यांचे सहकार्य लाभले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button