नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्या

बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा!


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे  लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

  • महापालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पायाभूत सुविधापाणीपुरवठा प्रकल्पमलनिःसारण प्रकल्पआरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ७०० किमी किलोमीटर रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाची कामेवर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्गगोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूलविक्रोळी पूलकर्नाक पूलसायन पूलमढ वर्सोवा पूल आदी पुलांची कामेदहीसरपोईसरओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्पयासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवामालाडभांडूपघाटकोपर येथील मलजल उदचन केंद्रवर्सोवा मलजल बोगदामिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे.  याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने सायन केईएमसायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणीदहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तसेच निक्षारीकरण प्रकल्पमिठी नदी पॅकेज ५पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्पदहिसर उद्यान विकासमानखुर्द वाहतूक केंद्रजिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालयदेवनार बायोमायनिंगदेवनार पशुवध आधुनिकीकरणमध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

  • हाजीअली येथे २ हजार वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारा – मुख्यमंत्री

            छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे दोन हजार वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावेअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत. प्रस्तावित प्रकल्पांसाठीच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

भविष्यात मुंबईला पाणीपुरवठ्यासाठीच्या गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

  • खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाहीयासाठी काळजी घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button