नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदार संघात लाखो नविन सभासद शिवसेनेशी जुळणार-आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व युवा नेते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यात नविन पदाधिकारी व सदस्यांची नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या असून येत्या महिन्याभरात पाचोरा व भडगाव तालुक्यातील १ लाख नविन सभासद नोंदणी करण्यात येणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,प्रविण ब्राह्मणे, सुनिल पाटील उपस्थित होते.
आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप आपल्या मतदार संघात पक्ष वाढीसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व नविन सभासदांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने पाचोरा मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा व भडगाव शहर व तालुक्यात पदाधिकारी, सदस्य यांच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. तसेच येत्या महिन्याभरात पाचोरा व भडगाव तालुक्यातुन १ लाख नविन सभासद नोंदणी केली जाणार असल्याची माहिती आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

  • २५ मे रोजी पाचोऱ्यात तिरंगा रॅलीचे आयोजन! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅपरेशन सिंदुर लाॅन्च करत पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवुन दिली आहे. आपल्या देशाचे जवानांचे शौर्य कौतुकास्पद असुन त्यांचे मनोबल अधिका अधिक मजबुत करण्यासाठी २५ मे रोजी पाचोरा शहरातुन सर्व पक्षीय व तमाम नागरिकांच्या उपस्थितीत भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button