जळगाव जिल्हाताज्या बातम्या
भिवंडी : नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचे अनिल महाजन यांच्या नेतृत्वात माळी समाजाकडून स्वागत

कल्याण (भिवंडी), दि. ०४ जुलै २०२५ : भिवंडी झोन २ येथे नव्याने पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्त झालेले श्री. शशिकांत बोराटे यांचे माळी समाज बांधवांनी भिवंडी येथे भेट घेऊन हार्दिक स्वागत केले. या प्रसंगी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी श्री. बोराटे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
श्री. बोराटे यांच्या नियुक्तीमुळे माळी समाजात आनंदाचे वातावरण आहे. समाजाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला माळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी समाजाच्या एकजुटीचे आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.