सफाई कामगार चावरिया यांना सेवेतकायमस्वरूपी करा:एकता सफाई कामगार संघटनेची मागणी!

पाचोरा तालुक्यातील लोहटार ग्रामपंचायत येथील लताबाई राजु चावरिया या ग्रामपंचायत मध्ये मागील २२ वर्षापासून काम करीत असून त्यांना कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून सेवेत रुजू करावे अशी मागणी सफाई कामगार संघटनेचे अतिश शांतीलाल चांगरे यांनी केली आहे. मौजे लोहटार ता.पाचोरा येथील ग्रामपंचायत मध्ये कै. राजू नत्थू चावरिया व नामे लताबाई राजु चावरिया हे दोघे सफाई कामगार म्हणून २१ ते २२ वर्षापूर्वी कार्यरत आहेत. त्यांचे पती कै.राजू नत्थू चावरिया त्यांचे १२ वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांची आतापर्यंत कायम स्वरूपी लेखी दप्तरी नोंद घेवून ऑर्डर दिलेली नसल्याने त्यांना ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरूपी लेखी दप्तरी नोंद घेवून ऑर्डर देवून समाविष्ट करावे अश्या पत्र लेखी स्वरुपात द्यावे तसे न झाल्यास एकता सफाई कामगार संघटना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायत लोहटार यांची राहील अशी मागणी करण्यात आली आहे.