पाचोरा येथील पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले यांची मंडळाधिकारी म्हणून पदोन्नती; राहुल पवार यांची नवीन पुरवठा निरीक्षक म्हणून नियुक्ती

पाचोरा, दि. ३० मे २०२५: पाचोरा महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले यांची जळगाव जिल्ह्यात मंडळाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. स्मित हास्य आणि जबाबदारीने काम करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी पुरवठा निरीक्षक म्हणून विशेष ओळख निर्माण केली होती. येवले यांच्या कार्यकाळात पुरवठा विभागात सर्व्हर डाऊन, रेशन पुरवठ्यात तुटवडा यासारख्या तक्रारींना सामोरे जावे लागले होते. तरीही त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे वेळोवेळी निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून चांगला संपर्क त्यांचा या पाचोरा तालुक्यात निर्माण झाला होता. परंतु पाचोरा विभागात त्यांना सहा वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची पदोन्नती झाल्याने अभिजीत येवले यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नवीन पाचोरा पुरवठा निरीक्षक म्हणून राहुल गोविंदराव पवार यांची तलाठी पदावरून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी भडगाव तालुक्यातील टोणगाव आणि गिरड येथे तलाठी म्हणून सेवा बजावली आहे. राहुल पवार हे सेवानिवृत्त पोलीस हेडकॉन्स्टेबल कै. गोविंद शंकर पवार यांचे चिरंजीव असून पाचोरा शहरातील रहिवासी आहेत. पवार स्थानिक असल्याने रेशन कार्ड आणि पुरवठा विषयक नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येवले आणि पवार यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.