गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,पाचोरा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन! जल ही जीवन वर विशेष प्रकल्प

राहुल महाजन,संपादक | (मधुर खान्देश) दि.२८/०२/२०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पाचोरा येथील गुरुकुल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाशी संबंधित विविध मॉडेल्स व प्रोजेक्ट्स बनविले. त्यामध्ये ३२८ विविध प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता. तसेच पाणी कसे वाचविले जाऊ शकते याच्याशी म्हणजे ” जल ही जीवन है” शी संबंधित विशेष विविध प्रकल्प तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या प्रतिकृतींशी संबंधित मराठी,हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये प्रमुख पाहुण्यांना , उपस्थित पालकांना माहिती देऊन सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन अनिलभाई दुलानी यांच्या हस्ते फीत कापून व *चंद्रयान मिशन-३* या वर्किंग मॉडेल रॉकेट प्रतिकृतीच्या सहाय्याने करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला नगरसेवक राम भाऊ केसवानी, हरिभाऊ पाटील ,डॉ.मनीष दादा चंदनानी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ” पाण्याचे विविध प्रतिकृती बनवून प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे लक्ष वेधून होते. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी भारतीय जैन संघटना महिला शाखेच्या महिला सदस्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक प्रेमकुमार शामनाणी सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अमिना बोहरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले.