नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा: सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांचा ५ जून २०२५ रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले अनिल येवले यांची हसतमुख आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून पाचोरा तालुक्यात खास ओळख आहे. परिस्थितीने गरीब पण सगळ्यांना नियमित खाऊ म्हणून चॉकलेट देणारे ‘चॉकलेट बॉय’ म्हणून परिचित असलेले येवले कोणत्याही सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतात आणि आपल्या प्रामाणिक कार्याने सर्वांचे मन जिंकतात. कुणालाही मदत करण्याच्या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या अनिल येवले यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरासह परिसरातील अनेक ठिकाणाहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत दीर्घायुष्यासाठी शुभकामना दिल्या. येवले यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांनी परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या शुभेच्छांनी अनिल येवले यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, ते पुढील काळातही समाजसेवा आणि पत्रकारितेच्या माध्यमातून आपले योगदान देत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button