जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे सरस्वती फौंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

पाचोरा, दि. ५ जून २०२५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरस्वती फाऊंडेशन पाचोरा यांच्या “ऐक मुलं, ऐक वृक्ष” मिशन २०२४ अंतर्गत पिंपळगाव हरेश्वर येथे उष:काल प्रतिष्ठानच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा यशस्वी कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरणातील अनिश्चित बदल, वाढते तापमान आणि अचानक पावसाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन याला प्राधान्य देत हा उपक्रम राबवण्यात आला असून. या कार्यक्रमात उष:काल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल तेली (भा. ज. पा. वैद्यकीय आघाडी, जिल्हा सरचिटणीस), भाऊसो. मधुकर काटे (भा. ज. पा. जिल्हा अध्यक्ष, जि. प. सदस्य जळगाव), आणि ताईसो. शोभा शांतीलाल तेली (भा. ज. पा. पाचोरा तालुकाध्यक्ष पूर्व) यांच्या हस्ते शेतकऱ्यांना निंब आणि आंबा वृक्षांचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. शांतीलाल तेली यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर हा उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाला मित्र परिवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सरस्वती फाऊंडेशनने दरवर्षी वृक्षलागवड आणि संगोपनाचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून उपस्थित सर्वांचे आभार मानत पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
