क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावात 85 वर्षीय आजीचा खून; परिसरात खळबळ

पाचोरा, दि. 6 जून 2025: पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावात आज सकाळी 4 वाजेच्या सुमारास एका 85 वर्षीय वयोवृद्ध आजीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटनेची माहिती मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने डोक्यात वार करून या आजीचा खून केला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.