नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावात मका लागवड करत असतांना अचानक वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; गावात शोककळा


Advertisements
Ad 4

पाचोरा (जळगाव), दि. 14 जून 2025: पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील 25 वर्षीय शेतकरी युवक मोहित जगतसिंग पाटील याचा आज दुपारी 3:50 वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. घटना गावाजवळील मोहित यांच्या शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच गावातील दिपक राजपूत, बाला जामसिंग पाटील, भरत सूरसिंग पाटील, पंढरीनाथ पाटील, बाळासाहेब कुमावत, कोतवाल गणेश पाटील, पोलीस पाटील चंद्रशेखर पाटील, कैलास कुमावत, कैलास रायसिंग पाटील, प्रतिश पाटील, संदीप राजपूत, अशोक आबा पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहित यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉ. अक्षय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button