शाळेत यायचे तेव्हा बालक होतात…आता मात्र पालक आहात;शिक्षक देसले सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन! खेडगाव नंदीचे येथील एच. बी. संघवी हायस्कूल, खेडगाव येथे २००६-०७ बॅचचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्नखेडगाव नंदीचे येथील एच. बी. संघवी हायस्कूल, खेडगाव येथे २००६-०७ बॅचचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

मधुर खान्देश वृत्तसेवा | खेडगाव, दि. १५ जून २०२५: एच. बी. संघवी हायस्कूल, खेडगाव येथे २००६-०७ च्या इयत्ता १० वीच्या बॅचचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे, भगवान गौड आणि जयश्री पाटील यांनी अतिशय उत्साहपूर्ण आणि प्रभावीपणे केले. यावेळी उपस्थित मान्यवर गुरुजनांपैकी श्री. देसले सर, श्री. आर. एम. पाटील सर आणि श्री. राहुल महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना भूतकाळातील आठवणींसह भविष्यासाठी दिशादर्शक सल्ला दिला.
या स्नेहसंमेलनात विजय पाटील, जयश्री पाटील, शुभांगी पाटील आणि प्रवीण पाटील, सुवर्णा पाटील यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना भावनिक क्षणांचा अनुभव दिला. बॅचच्या वतीने केलेल्या वृक्षारोपण उपक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांमधील बंध दृढ करण्यासोबतच सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. उपस्थित सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

