नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील किशोर पेंढारकर यांची कन्या डॉ. स्नेहल रावतेंच्या दुर्दैवी अपघातात निधन! बाहेरपुरा परिसरात हळहळ व्यक्त


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. १७ जून २०२५: पाचोरा शहरातील प्रसिद्ध सिमेंट सप्लायर किशोर पेंढारकर राहणार बाहेरपुरा पाचोरा यांची कन्या डॉ. स्नेहल प्रीतम रावते (डॉली) यांचे काल, १६ जून २०२५ रोजी रात्री भरधाव वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, आज १७ जून रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून बाहेरपुरा येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी डॉ.स्नेहल ह्या वडील किशोर पेंढारकर यांच्या सोबत जामनेर येथे पासपोर्टच्या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांना देण्यासाठी गेले होती त्यानंतर कामे झाल्यावर परतीच्या प्रवासात रात्रीच्या सुमारास शेंदुर्णी ता.जामनेर जवळ स्नेहल रावते यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने चिरडल्याने हा भीषण अपघात घडला असून घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली होती. तसेच जवळच्या पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दुर्दैवाने, स्नेहल यांचे वडील किशोर पेंढारकर यांच्यासमोरच ही घटना घडल्याने कुटुंबीयांचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

स्नेहल या पाचोऱ्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील होत्या. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी पोलिस चौकशी करीत असल्याची माहिती मिळाली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button